अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या

मुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू राय यांनी आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आपल आयुष्य संपवल आहे.

हिमांशू राय हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यामुळे आजराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेल होत.

१९८८ च्या आयपीएस अधिकारी असणारे हिमांशू राय यांनी मुंबई क्राईम ब्रांच, एटीएएस सारख्या महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. जे डे हत्याप्रकरण, आयपीएल फिकिंग, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, लैला खान डबल मर्डर सारखी प्रकरणे त्यांनी हाताळली होती.

You might also like
Comments
Loading...