कोण म्हणतं महाराष्ट्रीयन माणूस व्यवसाय करू शकत नाही? मग हे कोण ज्यांनी रचला इतिहास

marathi industrial

आजवर कायम मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. हेच आपण ऐकत आलो आहोत. काही लोकांकडून ‘मराठी माणूस फक्त दुसऱ्याकडे चाकरीच करू शकतो मात्र स्वतचा व्यवसाय कधीही नाही’ अशा प्रकरचे टोमणेही मारले जातात.  मात्र महाराष्ट्रात जन्मलेले असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी उद्योग जगतात इतिहास निर्माण केला आहे. आज आपण अशाच काही उद्योजकां बद्दल वाचणार आहोत ज्यांनी शून्यातून आपल अस्तित्व निर्माण केल आहे.

स्वर्गीय शंतनूराव लक्ष्मणराव किर्लोस्कर


शंतनूराव किर्लोस्कर यांचे वडील लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाची स्थापना केली होती. शंतनूराव हे स्वातंत्र पूर्व काळातील एक उद्योगी विचार असणारे होते. देशात राहूनही आपण चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो हे त्यांनी जानल होत. स्वातंत्र्यानंतर देशातील डीझेल इंजिन व्यवसायाच्या वाढीत त्यांच मोठ योगदान आहे. आज किर्लोस्कर ग्रुप हा भारतातील सर्वात मोठी इंजिनीयरिंग कंपनी म्हणून ओळखला जातो. १९६५ ला शंतनूराव किर्लोस्कर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राजेंद्र पवार


राजेंद्र पवार हे एनआयआयटी या आयटी कंपनीचे संस्थापक चेअरमन आहेत. आयटी उद्योगात ‘जनरल डाका क्वेस्ट’ने दिलेल्या योगदानासाठी आयटी मॅन ऑफ द इयरचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रपतींच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या (पीआयएसी) इन्फॉर्मेशन सोसायटीसह विविध औद्योगिक संस्थांच्या गुणवत्ता समितीचे ते प्रमुख आहेत.

चंद्रशेखर भास्कर भावे

चंद्रशेखर भास्कर भावे यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. भारतीय आर्थिक नियामक मंडळावर ते होते. फेब्रुवारी २००८ मध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे अध्यक्ष म्हणून तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भावे यांची उत्कृष्ट, प्रामाणिक व सरळ अधिकारी म्हणून ओळख आहे.

विवेक रणदिवे


भारतीय उद्योजक, अभियंता, लेखक,वक्ते आणि दानशूर व्यक्ती म्हणून विवेक रणदिवे यांची ओळख आहे रणदिवे, तिबकोचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, १९८० मध्ये जगविख्यात वॉल स्ट्रीट डिजीटल करण्याच श्रेय त्यांची कंपनी ‘टेकनेर्रॉन’ सॉफ्टवेअर सिस्टिम्सला जाते. द पॉवर टू पेडिक्टेट, द टू-सेकंड एडवाँटेज. व्हाई व्हायफुर्ड फॉर एन्टीटिंग द फ्यूचर-जस्ट इफ, द न्यू यॉर्क टाईम्स, फोर्ब्स, द वॉल स्ट्रीट जर्नल अशा अनेक पुस्तकाचे ते लेखक आहेत.

विक्रम पंडित


विक्रम पंडित हे महाराष्ट्रातील नागपूरच्या धंतोली परिसरात जन्माला आलेले भारतीय वंशाचे अमेरिकन बँकर आहेत.  २००७ ते २०१२ पर्यंत ते सिटीग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सध्या ते पत्नी व दोन मुलांसोबत न्यूयॉर्कमध्ये राहत आहेत. विक्रम शंकर पंडित यांनी बी.एस. तसेच एम.एस. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांना कोलंबिया विद्यापीठातून या पदव्या मिळवल्या आहेत. तसेच बिझनेस स्कूल ऑफ फायनान्समधून पी. एच.डी केली आहे .

नानासाहेब परुळेकर


नारायण परुळेकर यांना नानासाहेब परुळेकर म्हणूनही ओळखले जाते, ते सकाळचे संस्थापक व संपादक होते. सकाळ हे एक नामवंत मराठी वृत्तपत्र आहे. त्यांनी जानेवारी १९९२ मध्ये सकाळ वृत्तपत्र सुरू केले. परुळेकर हे  प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. सकाळ, गोमंतक आणि सकाळ टाइम्स हे सकाळ माध्यमाचे प्रकाशन आहे. सकाळच्या लाखो प्रती महाराष्ट्रात विकल्या जातात.

हनमंतराव गायकवाड

राष्ट्रपती भवन ,दिल्ली उच्च न्यायालय, पंतप्रधानांचे निवासस्थान, संसद भवन या सारख्या अत्यंत प्रतिष्ठीत वास्तूची निगाराखणे काही सोप्पे काम नाही पण अशाच देशातील कित्येक महत्वाच्या वास्तूंची निगा राखण्याचे काम बीव्हीजी ग्रुप गेली कित्येक वर्ष अविरत करत आहे.

हनुमंतराव गायकवाड हे भारतातील सर्वात मोठ्या हाउसकीपिंग फर्मचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.एक लाख कोटी हून अधिक वार्षिक उत्पन्न असणारा बीव्हीजी संस्था सफाई कामगारापासून ते पल्म्बर पर्यत सर्व सुविधा पुरविते. हनुमंतरावाचे वडील हे पुणे सत्र न्यायालयात शिपाई होते. हनुमंतराव शाळा सुटल्यावर रेल्वे स्थानकावर फळे विकण्याचे काम करत.

डॉ. विठ्ठल वेंकटेश कामत

पर्यावरणवादी, उद्यामी, शिक्षणतज्ञ, पुराणवस्तुशास्त्र, एक पक्षीविज्ञानी, ग्लोब ट्रॉटर आणि ब्लॅक बेल्ट कराटेका बहुमुखी व्यक्तिमत्व म्हणून विठ्ठ्ल कामत यांची ओळख आहे. देशभरामध्ये कोठेही जा शाकाहारी लोकांची पहिली पसंद असते ती हॉटेल कामतलाच.

११२ कोटी रुपये वार्षिक उलाढाल असणाऱ्या कामत हॉटेल ग्रुपची सुरुवात एका छोट्या हॉटेल पासून झाली. मुंबईतील आर्टिस्टिकटी ग्रुपचा ऑर्किड हॉटेल आणि लोटस स्वीट यासारख्या ब्रॅण्डचा समावेश देखील कामत ग्रुपमध्ये होतो. कामत यांचा जन्म मुंबई येथील एका मध्यमवर्गीय कुंटूबात झाला होता.

बाबासाहेब नीलकांत कल्याणी

बाबासाहेब नीलकांत कल्याणी ज्यांना बाबा, बी.ए., एम.एस. असेही ओळखले जाते. भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत आहे. जगातील फॉरेस्ट मशीन्समध्ये जाणारे धातूच्या फोर्जर्सचे भारत फोर्ज उत्पादन करतात. विदेशी बाजारपेठेतील महसुलातील  दोन-तृतियांश भारत फोर्ज कमावते. कल्याणी यांनी पिलानी येथील बिरला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि मॅसॅच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर १९७२ मध्ये पुण्यात आपल्या वडिलांच्या कारखान्यात ५०० रुपये प्रति महिना काम करण्यास सुरुवात केली.

लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या प्रभावात येऊन कल्याणी यांच्या वडिलांनी मशीन उत्पादनास सुरुवात केली. कल्याणी यांनी २००२  मध्ये भारतातून चीनमध्ये ऑटोमोबाइल घटकांची निर्यात सुरू केली. भारत फोर्ज आठ वर्षे सलगपणे ऑटोमोटिव्ह घटकांची देशातील सर्वात मोठी निर्यातदार म्हणून देशांतर्गत निर्यात करत असून एकूण निर्यात 50% इतकी आहे.  भारत फोर्जच्या जागतिक ग्राहकांमध्ये ३८ ऑटोमोबाईल उत्पादक आणि उद्योगांना अनेक टायर पुरवठादार आहेत.

आनंद देशपांडे

आनंद देशपांडे  हे पर्सिस्टंट सिस्टीमचे  संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. पर्सिस्टंट सिस्टीम्स एक टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस कंपनी आहे. पुण्यात सुरू झालेल्या ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ने गेल्या २६ वर्षांत सॉफ्टवेअर विकसनाच्या क्षेत्रात उत्तम नाव कमावले आहे. ज्या काळी माहिती तंत्रज्ञानात व्यवसाय करण्यात अनेक पायाभूत सुविधांच्या अडचणी होत्या, त्या काळात ही कंपनी सुरू झाली. सर्व आव्हाने पेलत टिकून राहिली आणि विस्तारली. आज बारा देशांमध्ये त्यांची केंद्रे आहेत. भारतातून सॉफ्टवेअर निर्यात करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १९९०च्या सुमारास ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’ अशी एक योजना सुरू झाली होती. त्या वेळी आनंद देशपांडे हे अमेरिकेत कार्यरत होते. या योजने विषयी कळल्यावर त्यांनी पुण्यात परतून एक कंपनी सुरू करण्याचे ठरवले. माहिती तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर क्षेत्रात आपली एक विशेष ओळख तयार केलेली हीच ती ‘पर्सिस्टंट’ कंपनी.