भारत विश्वविजेता ; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवल…!

टीम महाराष्ट्र देशा: भारताने ६ वर्षांनी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात ८ विकेट्सने पराभूत करत हा विश्वचषक जिंकला आहे.

भारताने तब्बल चौथ्यांदा हा विश्वचषक जिंकला असून अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव संघ आहे. या विजयात भारताकडून मनजोत कार्लाने शतकी खेळी आहे तर हरवीक देसाईने त्याला चांगली साथ दिली.
या संघाचे प्रशिक्षपद हे माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी सांभाळले तर मुंबईकर पृथ्वी शॉने या संघाचे नेतृत्व केले.

ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करतना भारतासमोर अवघ्या २१७ धावांचं लक्ष ठेवलं होत. भारताच्या संघाने २ विकेट गमावत हे लक्ष पूर्ण करून आपणच विश्वविजेता असल्याच जगाला ठणकावून सांगितल.

You might also like
Comments
Loading...