आधी मांसबदी पुन्हा नोटबंदी, उद्या हे सरकार नसबंदी देखील करेल – धनंजय मुंडे

वसमत: केंद्र आणि राज्य सरकारला सामन्यांच्या प्रश्नांविषयी काही देणघेण नाहीये. यांनी आधी मांसबदी आणि नोटबंदी केली आपण वेळीच सावध झालो नाहीतर उद्या हे सरकार नसबंदी करेल असा उपरोधिक टोला विधान परिषेदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मराठवड्यामध्ये काढण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान ते परभणी जिल्ह्यातील वसमत येथे बोलत होते. नोटबंदी सारखे निर्णय घेवून जनता सरकारच्या बाजूने असल्याच भाजप नेते सांगतात. मात्र हे वेडे झाले असून वेळीच सावध होण्याची गरज आहे. तसेच मांसबदी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी मुंडे यांनी केला.

You might also like
Comments
Loading...