नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत, ज्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्या मिळू शकतात. खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे यांची कि शिंदे गटाची?, बंडखोर आमदारांचं भवितव्य काय? पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान होणं कायदेशीरदृष्ट्या योग्य कि अयोग्य?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात याच संदर्भातील एकूण चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. शिंदे सरकार पात्र कि अपात्र हे यावरच अवलंबून असल्याने सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.
उद्या सुनावणी होणाऱ्या याचिकांमध्ये पहिली याचिका आहे, पक्षाशी बंडखोरी केलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरण्यासंदर्भातील. तर शिंदे गटाने निवड आणि जाहीर केलेल्या प्रतोदाला शिवसेना पक्षाचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यावर आक्षेप घेतल्याची दुसरी याचिका आहे. तिसरी आणि सर्वात महत्वाची याचिका आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भातली. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याला, त्यांच्या शपथविधीला आणि त्यांच्या विशेष अधिवेशन घेण्याला शिवसेनेने या याचिकेत आक्षेप घेतलेला आहे. तर शेवटच्या याचिकेत राज्यपालांनी तत्कालीन ठाकरे सरकारला दिलेल्या विश्वास मताबाबतीतील निर्देशांना आव्हान देण्यात आलेले आहे. या चारही याचिका शिंदे सरकारच्या भवितव्यासाठी आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
या याचिकांसाठी घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. या घटनापीठात मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना, न्यायमूर्ती हेमा कोहली आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांचा समावेश आहे. जर उद्याच्या सुनावणीत १६ आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर मात्र राज्यातील सरकार पुन्हा कोसळू शकतं. तर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित प्रश्नावर सुनावणी न घेण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. याबरोबरच खरी शिवसेना ठाकरेंची कि शिंदे गटाची हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवा, अशी एक नवी याचिका देखील शिंदे गटाने न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीवर राज्यातील सत्ता राहणार कि जाणार हे बऱ्याच अंशी अवलंबून आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने युद्धाचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
शिंदे आणि ठाकरे आज आमने-सामने
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे सोमवारी कोकणातील सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. तर आदित्य ठाकरे देखील पुण्यात येत आहेत. अशा स्थितीत एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच शहरात शिंदे-ठाकरे यांच्यात आमने-सामने आल्यावर काय होणार, अशी उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Chandrakant Patil | “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी” ; पवारांच्या पुरंदरेंवरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- Ayman Al-Zawahiri | अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या गुप्त ऑपरेशनमध्ये ठार
- Bhagat Singh Koshyari | अखेर राज्यपालांचा माफीनामा! म्हणाले होते, मुंबईतून राजस्थानी-गुजराती गेल्यास काय उरणार?
- Eknath Shinde and Aditya Thackeray | एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज पुण्यात आमने-सामने येणार?
- Sanjay Raut | राऊतांच्या घरी सापडलेल्या पैश्यांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव, मुख्यमंत्री म्हणतात…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<