उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे.

या जाहीरनाम्यात प्रामुख्याने राम मंदिर, कलम ३७० आणि समान नागरी संहिंता रद्द करण्याविषयी तरतूद असण्याची शक्यता आहे. तसेच बेरोजगार तरुणांसाठीही महत्वाची घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपतर्फे नागरिकांसाठी महत्वाच्या योजनाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने आपला जाहीरनामा याआधीच जाहीर केला आहे त्यांनी देशद्रोहाच्या मुद्द्यासह शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे. त्यामुळे भाजप आता कोणत्या मुद्द्यांवर जोर देणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.