टोलमाफी 2 डिसेंबरपर्यंत; वाहनचालकांना दिलासा

वाहतुक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी व वाहनधारकांना नोटाबंदीचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीला 2 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 2 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली होणार नाही. याचसोबत राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्‍यावर 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 15 डिसेंबरपर्यंत पाचशेच्या फाटक्‍या नोटा स्विकारल्या जातील, असेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले.