fbpx

उभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकणार नाही – नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा : एकीकडे महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकार टोलमुक्तीचा नारा देत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत टोलमुक्तीची सुतराम शक्यता नसल्याच सांगितल आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, देशातील विविध भागात टोल वसुलीवरून काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे त्या भागातच टोल वसुली केली जाते. या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात असल्याचे ते म्हणाले.

सरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात 40 हजार किमींचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष्यात बंद होऊ शकणार नाही, मात्र, गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

दुसरीकडे भाजपचे सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी’ भाजपचे ओळखपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. कारण आयकार्डवर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे,’ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेत्यानंच ही सणसणीत चपराक आहे.