भाजपने २०१९ मध्ये फटका बसेल म्हणून तोडली पीडीपीशी युती- आठवले

भाजपनं राजकीय फायद्यासाठीच जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी युती तोडली

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये भाजपने राजकीय फायद्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी तोडली. असा घरचा आहेर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला. आठवले आज जागातिक योग दिनानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आठवले म्हणाले, भाजपनं राजकीय फायद्यासाठीच तीन वर्षांपूर्वी पीडीपीशी युती केली आणि आता राजकीय फायद्यासाठीच युती तोडली. पीडीपीशी युती कायम ठेवल्यास २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका पडेल असा विचार करूनच भाजपनं युती तोडली. असे आठवले म्हणाले.