fbpx

आजचा कार्यक्रम भाऊसाहेब फुंडकरांना समर्पित – पंकजा मुंडे

pandurang fundakar

गोपीनाथ गड : आज गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्याचे स्व. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची उणीव भासत असल्याच सांगत आजचा कार्यक्रम भाऊसाहेब फुंडकरांना समर्पित करत असल्याच स्पष्ट केल.

स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि जिवलग मित्र असणारे राज्याचे स्व. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर याचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे फुंडकर आज आपल्यात असते तर नक्कीच या मंचावर उपस्थित राहिले असते अस सांगताना पंकजा मुंडे यांना भावना अनावर झाल्या.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ४ थ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार उदयनराजे भोसले,खासदार संभाजीराजे भोसले,सहकारमंत्री सुभाष देशमुख,सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.