मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे अनुपस्थित मात्र पवार लावणार हजेरी

टीम महाराष्ट्र देशा : ‘ एक देश एक निवडणूक’ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला देशातील अनेक पक्षांचे प्रमुख नेते हजेरी लावणार आहेत. मात्र मोदी विरोधी पक्ष या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. तर राज्यातून या बैठकीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजेरी लावणार आहेत.

तर मोदींच्या या बैठकीला तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार टाकला आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपापासून लांब राहण्याचं धोरण अंवलंबल आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. तसेच तेलगु देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल देखील अनुपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचा वर्धापनदिन कार्यक्रम असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट आहे.

Loading...

नरेंद्र  मोदींच्या या बैठकीला जायचं की नाही याबाबत कॉंग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उपस्थिती बाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुपारी ३ वाजता संसद भवनाच्या लायब्रेरीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. पंतप्रधानांनी बोलविलेल्या या सर्वपक्षीय बैठकीत एक देश, एक निवडणूक याव्यतिरिक्त २०२२ मध्ये भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत, तसेच महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण