मराठा आरक्षणावरून शिवसेनेमध्ये खलबतं, मुंबईमध्ये आज आमदारांची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सरकार अडचणीत येत असताना दिसत आहे, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन देखील आंदोलन मागे घेण्यास मराठा समाजाकडून नकार देण्यात आला आहे. त्यानंतर आता सर्वपक्षांनी आपल्या आमदारांची बैठक बोलण्यास सुरुवात केली आहे आज मुंबईमध्ये शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार असून यामध्ये आरक्षणाच्या मागणीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८  जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे. मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.

राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.

आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

सरकारने ‘ते’ संभाषण जनतेसमोर आणावं – प्रकाश आंबेडकर

मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे