fbpx

आयपीएलमध्ये आज केकेआर आणि पंजाबमध्ये लढत

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होणार आहे. सलामीचे सामने जिंकून दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली आहे. कोलकाता संघात फलंदाजीची मदार क्रिस लीन, नितीश राणा,दिनेश कार्तिक यांच्यावर असेल. आंद्रे रसेलचा दमदार फॉर्म ही केकेआरसाठी जमेची बाजू आहे. मागच्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न ते करतील.

दुसरीकडे पंजाबच्या संघात क्रिस गेल चांगल्या लयीत आहे, त्याने मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्यासह लोकेश राहुल, मयंक अग्रवाल व सर्फराज खानवर फलंदाजीची मदार असेल. त्यांना रोखण्याची जबाबदारी सुनील नारायण, पियुष चावला, कुलदीप यादव यांच्यावर असेल.