fbpx

केकेआर आणि हैदराबाद मध्ये रंगणार रंगतदार सामना

टीम महाराष्ट्र देशा : काल आयपीएल २०१९ ची सुरुवात धमाक्यात झाली. आज दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात इडन गार्डन मैदानावर खेळला जाणार आहे. दोन्हीही संघ विजयाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. कोलकत्याकडे क्रिस लीन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, सुनील नारायण, शुभमन गिल, कुलदीप यादव, पियुष चावला, लोकी फर्गुसन, आंद्रे रसेल असे एकहाती सामना फिरवणारे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर सगळ्याचं लक्ष आहे.

दुसरीकडे हैदराबादच्या संघात केन विलियम्सन, साहा, मनीष पांडे, युसुफ पठाण, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, विजय शंकर, शाकीब अल हसन यांसारख्या गुणी खेळाडूंचा समावेश आहे. हा सामना अत्यंत अतितटीचा होणार यात शंका नाही. जो संघ मैदानावर चांगला खेळ करेल तोच विजयी ठरेल. हा सामना जिंकत विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ पुरेपूर प्रयत्न करतील यात शंका नाही.