मराठा मोर्चांसमोर सराकर नतमस्तक – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा: महाभारतात श्रीकृष्णाने विराट रुपाचं दर्शन दिल्यावर जशी सृष्टी नतमस्तक झाली, त्याप्रमाणे मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विराट रुपाचे दर्शन झाले. सरकार या रुपापुढे नतमस्तक झाले आणि त्यामुळे विविध निर्णय घेतले. अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईतील एलफिन्स्टनमध्ये कामगार मैदानात आय़ोजित मराठा सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

त्याचप्रमाणे भारताचं आजचं स्वरुप हे मराठ्यांचे कार्य आणि शौर्यामुळेच असल्याच देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. त्यावर कार्यवाही सुरु आहे. न्यायालयात यावर सरकार सक्षमपणे काम करते आहेच मात्र , मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आणि उच्च शिक्षणाची दारे उघडली गेली. लाखो तरुण या योजनेचा फायदा घेत आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ केवळ कागदावर होते, ते आम्ही जिवंत केले. त्यातून तरुण लाभ घेत आहेत.”, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

You might also like
Comments
Loading...