fbpx

वाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे महत्वाचे निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीतील १० महत्वाचे निर्णय

१. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन खरेदीसाठीच्या आर्थिक व्याप्तीत वाढ.

२. मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती,औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा.

३. सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची २५ एकर जागा कायमस्वरूपी देण्याचा निर्णय.

४. चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर,त्सुनामी, गारपीट, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन.

५. अधिकाधिक तरूण सैन्यदलात यावेत यासाठी सैनिकी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन सैनिकी शाळेतील ३६ शिक्षक पदांना अनुदान.

६. नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची ३३ पदे आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे वर्ग.

७. ऊर्जा विभागाच्या आस्थापनेवर मुख्य विद्युत निरीक्षक हे विभागप्रमुखाच्या वेतनश्रेणीतील पद निर्माण करण्यास मान्यता.

८. राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत हंगाम २०१६-१७ मध्ये खरेदी केलेल्या तुरीची विक्री करण्याबाबतच्या धोरणास मान्यता.

९. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) प्रकल्पासाठी सवलत करारनाम्यास मान्यता.

2 Comments

Click here to post a comment