‘आजचा कोर्टाचा निर्णय हा मराठा तरुण पिढीवर परिणाम करणारा’

maratha

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय दिलेला आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होत.

आज १०:४५ मिनिटांच्या सुमारास कोर्टाने त्यांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे.

कोर्टाच्या या निर्णयावर आता मराठा क्रांती मोर्चाकडून प्रतिक्रिया येत आहेत. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही,मराठा समाज मागास नसून गायकवाड आयोगाचा अहवाल स्विकारहार्य नाही असं मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे आहे. यामुळे मराठा तरुण पिढीवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे.

बाकीच्या राज्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? सरकार मधील आरक्षणाचा एकही समर्थक नाही. राजकिय नेत्यांना इतर समाजाशी असलेली नाळ तोडायची नाही.त्यांना माहीत आहे मराठा समाज कुठेही जात नाही.या अविर्भावात सर्व राजकीय नेत्यांनीच मराठा समाजाचे अतोनात नुकसान केले आहे.

मराठा समाजाचा वापर करून स्वतःची तुमडी भरून घेत कुठल्याही नेत्याला मराठा समाजाचे काही देणे घेणे नाही.स्वतःची आमदारकी खासदारकी आणि मंत्री पदे महत्वाची आहेत.अश्या सगळयांनी मराठा समाजाला फरफटत घेवून जात असल्यानेच मराठा आरक्षण रद्द झाले आहे.जे उच्च न्यायालयात टिकले तेच आरक्षण सर्वोच्च न्यायालय रद्द केले या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.’ असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश टेळे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या