fbpx

शिस्तप्रिय तुकाराम मुंडेंवर आता असणार ‘ही’ महत्वाची जबाबदारी

tukaram-mundhe-

टीम महाराष्ट्र देशा : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अवघ्या नऊ महिन्यांतच ही बदली झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांतही ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली. पण, नाशिकच्या आयुक्तपदानंतर मुंडेंची बदली नेमकी कुठे करण्यात आलीय, हे काही स्पष्ट होत नव्हतं. आता मात्र हे स्पष्ट झालंय. तुकाराम मुंडेंची सहसचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आलीय.

तुकाराम मुंडे यांना बदलीचे आदेश नुकतेच मिळाले असून मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदी त्यांची बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिकेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटांतच मुंढेंना बदलीचे पत्र मिळाले. माझ्याकडे अद्याप बदलीसंदर्भातील काोणतीच ऑर्डर आली नाही, त्यामुळे मी नियमीत कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली आहे.

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी दणका! गणवेशात नसल्याने अधिका-याला बैठकीतून बाहेर काढलं