आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे

पुणे : मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा मुलभूत हक्क आहे. पण गेली ३० वर्षे हा प्रश्न चिघळतो आहे. एक संपूर्ण पिढी त्यामुळे आरक्षणापासून वंचित राहिली आहे. किती अंत पाहणार लोकांचा, असा उद्विग्न सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा आणखी उद्रेक होऊ शकतो, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

Loading...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी बंद आणि मोर्चे या सारखी आंदोलने काढली जात असताना, आज शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयनराजे बोलत होते.

आज होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेसाठी मराठा समाजातील मान्यवर, आंदोलनाचे समन्वयक, तज्ञ, इतिहास अभ्यासक उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा काय असावी यावर मंथन झालं. आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत तोडफोड किंवा आत्महत्या करू नये. तीस वर्ष झाली तरी आरक्षण मिळालं नाही अजून किती वाट पहायची ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मुलभूत अधिकारांसाठी लोकांवर भिक मागण्याची वेळ आली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे :

-आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये – खा. उदयनराजे.

-आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला : उदयनराजे भोसले.

-सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले – खा. उदयनराजे.

-आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? – खा. उदयनराजे.

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं – खा. उदयनराजे.

-30 वर्षांपासून मराठा आरक्षणावर केवळ चर्चाच होतेय – खा. उदयनराजे.

 Loading…


Loading…

Loading...