आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार

आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार

sharad pawar

मुंबई : यशवंतराव चव्हाण(Yashvantrao Chavhan) यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गुरुवारी(२५ नोव्हें.) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज आहे. विविध आजारांसाठी लशींची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची निवड या पुरस्कारासाठी केली याचा मला अभिमान असून हा विज्ञानाचा सन्मान आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी बोलत असतांना पवार म्हणाले की,’‘सीरम’चा जन्म झाला तेव्हापासून या संस्थेसोबत माझा संपर्क आहे. पुनावाला यांनी अतिशय लहान जागेत संस्थेची सुरुवात केली. त्यांच्या वडिलांचे पुण्यात फर्निचरचे दुकान होते. त्यांचा संशोधनाशी काहीही संबंध नव्हता. पण एखादे काम हातात घेतल्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा स्वभाव होता. आज जागतिक पातळीवर अशा पद्धतीचे काम करणारी एकही संस्था नाही. आज जगभरात पाच बालकांना दिल्या जाणाऱ्या लशींपैकी तीन लशीची निर्मिती ‘सीरम’ने केलेली आहे. व्यक्तीच्या कर्तृत्त्वाचे मोजमाप आपण करत नाही, त्याचे उदाहरण म्हणजे सायरस पुनावाला. त्यांना पद्मश्री मिळाला, मला पद्मभूषण मिळाला. खरेतर माझ्यापेक्षा त्यांचे कर्तृत्त्व निश्चित अधिक आहे. त्यामुळे खूप वेळेला भारत सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्यात आम्ही कमी पडतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुनावाल आणि सीरम इन्स्टिटय़ूट. पण पुनावाला या गोष्टीचा विचार करत नाहीत, ते आपले काम करत असतात.’

दरम्यान, यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ‘सीरम इन्स्टिटय़ूट’च्या संशोधन आणि विकास विभागाचे संचालक डॉ. उमेश शालीग्राम, खासदार सुप्रिया सुळे, निवृत सनदी अधिकारी शरद काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक अंबरीश मिश्र यांनी केले.

महत्वाच्या बातम्या: