राज्यात आज १०,९८९ रुग्णांची वाढ, तर १६,३७९ जण कोरोनामुक्त

corona

मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे.

राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच आज कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज १० हजार ९८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज १६ हजार ३७९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात १० हजार २१९ रुग्णांची नोंद झाली होती.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.४५ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,०१,८३३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे.

सकारात्मक! या शहरात एकही मृत्यू नाही
ठाणे, मीरा भाईंदर मनपा, मालेगाव मनपा, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव मनपा, नंदूरबार, पिंपरी चिंचवड मनपा, सोलापूर मनपा, हिंगोली, लातूर, लातूर मनपा, नांदेड मनपा, अकोला, अमरावती मनपा, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर मनपा, गडचिरोली याठिकाणी एकाही मृत्यूची नोंद नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP