आज ट्रिपल तलाक बंद केला उद्या ते बुरखा देखील बंद करतील – एमआयएम आमदार

imtiyaz-jaleel

औरंगाबाद : मुस्लीम समाजामध्ये असणाऱ्या ट्रीपल तलाक सारख्या प्रथांमुळे लाखो महिलांच आयुष्य उधवस्त होत असल्याच कारण देत केंद्र सरकारकडून या विरोधात कडक कायदा बनवला जात आहे . मात्र एका बाजूला या निर्णयाच स्वागत करत असतानाच आता एमआयएमने सरकारवर टीका करण्यासही सुरुवात केली आहे. सरकारने ट्रिपल तलाक बंद केला, उद्या ते बुरखा देखील बंद करतील असा आरोप आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. एमआयएमच्या वतीने औरंगाबादमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

इम्तियाज जलील भाजपला उद्देशून म्हणाले कि, आयुष्यभर तुमच्या डोक्यावर ताज राहणार नाही. ‘सत्तेवर आल्यावर तुम्ही काहीही करु शकता, असा विचार करत असाल तर सत्तेत येण्याआधी तुम्ही काय होते याचा सुद्धा विचार करा’. तसेच हज अनुदान बंदीवर भाष्य करतांना जलील म्हणाले अनुदान बंद केलं म्हणून मुस्लीम हज यात्रेला जाणार नाहीत हा सरकारचा गैरसमज आहे. तसेच हे सरकार ट्रिपल तलाक बंद करत आहे. उद्या बुरखा देखील बंद करतील. त्यामुळे अशा अन्यायाचा सामना करण्यासाठी मुस्लीम समाजाने एकत्र येवून लढा देण्याचे आवाहन जलील यांनी केले.