Share

Soler Eclipse | आज वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा ‘या’ राशीवर होणार आहे सर्वाधिक प्रभाव

टीम महाराष्ट्र देशा: यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये खगोल प्रेमींना पहिले सूर्यग्रहण Soler Eclipse अनुभवायला मिळाले होते. दरम्यान, आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पार पडणार आहे. जेव्हा सूर्य Sun, पृथ्वी Earth आणि चंद्र Moon एकाच रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. आजचे हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग तसेच संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून बघायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र ( सॅरोस) 124 क्रमांकाचे आहे.

खंडग्रास सूर्यग्रहणाची Soler Eclipse वेळ

वर्षाचे हे शेवटचे सूर्यग्रहण असून भारताच्या अंशतः भागांमध्ये ते दिसणार आहे. भारतामध्ये हे सूर्यग्रहण संध्याकाळी 4.22 वाजता सुरू होऊन सूर्यास्ताच्या वेळी 6.32 वाजता संपेल. आज सूर्यग्रहणामुळे गोवर्धन पूजेचा उत्सव 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे.

सूर्यग्रहणाचा या राशींवर होईल प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार,दिवाळीत आलेला हा सूर्यग्रहणाचा काळ तुळ राशीमध्ये होणार आहे. सूर्यग्रहणा दरम्यान या राशीतील सूर्य दुर्लभ असल्याने त्याचे अशुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र, सूर्य, शुक्र आणि केतू तूळ राशीत प्रवेश करतील. तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक आव्हाने येऊ शकतील. त्याचबरोबर या लोकांना काही त्रासांना सामोरे जाऊ लागू शकते. ग्रहणादरम्यान, तूळ राशीतील लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तूळ राशी बरोबर मिथुन आणि मकर राशीच्या लोकांवर देखील या सूर्यग्रहणाचा विशेष प्रभाव राहील.

तुळ राशीसाठी सूर्यग्रहणातील उपाय

आजच्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा तुळ राशी वर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळे तूळ राशीने सूर्यग्रहणादरम्यान माता लक्ष्मीची पूजा करावी. त्याचबरोबर गरीब आणि गरजूंना मिठाई, अन्न, वस्त्र इत्यादी गोष्टी दान कराव्या.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये खगोल प्रेमींना पहिले सूर्यग्रहण Soler Eclipse अनुभवायला मिळाले होते. दरम्यान, आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now