कोल्हापुरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद

इंटरनेट सेवा बंद

कोल्हापूर  : महाराष्ट्र बंद दरम्यान उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमध्ये आज इंटरनेट सेवा आज (गुरुवार) बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे.Loading…


Loading…

Loading...