आज सोलापुर शहर बंद …ग्रामिण सुरळित राहणार

सोलापुर : सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसापासुन रस्त्यावरची आरपार ची लढाई सुरु केली आहे. सोलापुर जिल्ह्यात देखील मराठा समाज सातत्याने विविध आंदोलमातुन सरकारचे लक्ष वेधुन घेत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सकाळी गावडे मंगल कार्यालयात घेतलेल्या मराठा बैठकित फक्त सोलापुर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर सोलापुर ग्रामिण जिल्हा सुरळित चालु राहिल असेही समन्वयकांनी सागिंतले.

सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासुन रात्री पर्यंत पुर्ण दिवसभर सोलापुर शहर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बंद ठेवुन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तर मागिल आठ दिवसापासुन सोलापुर जिल्ह्यातील माढा , करमाळा , सांगोला , माळशिरस , बार्शी , मोहोळ , मंगळवेढा हे तालुके व यातील अनेक गावात सातत्याने बंद होत राहिले आहेत. आठ दिवसात माढा तालुका तीन वेळ बंद राहिला आहे. करमाळा दोन वेळा बंद राहिला आहे. त्यामुळे सोलापुर ग्रामिण सुरळित चालु राहिल पण विविध मार्गाने आंदोलन चालु ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. या बैठकिला सर्व पक्षातील सर्व जेष्ठ व युवक नेते तसेच सर्व संघटना आणी सर्व कार्यकर्ते ऊपस्थित होते.

मराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्या : आ.भुमरे