मुख्यमंत्र्यांनी वाजवला पुण्यात ढोल

पुणे : दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ आवारात आमदारांच्या फुटबॉल मॅच वेळी कॉमेंट्री करणारे मुख्यमंत्री आपल्याला पहायला मिळाले. तर आज पुण्यात चक्क मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवला आहे. निमित्त होते ते सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी पर्वाच्या लोगो अनावरण आणि ध्वजारोहण कार्यक्रमाचे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या पर्वाला आज पासून सुरुवात झाली आहे. पुणे महापालिकेकडून यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.

 

You might also like
Comments
Loading...