संतापजनक! जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली तीन पोलिसांची हत्या

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण करून त्यातील तिघांची निघृणपणे हत्या केली आहे. या तीनही पोलिसांचे मृतदेह पोलिसांना सापडल्याने खळबळ उडाली आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका पोलिसाची दहशतवाद्यांनी सुटका केली आहे. शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी या पोलिसांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले होते. दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Loading...

‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेनं अलीकडंच जम्मू-काश्मीरमधील सर्व पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. ‘हिजबुल’चा दहशतवादी रियाज नाइकू याने काही दिवसांपूर्वी ही धमकी दिली होती. पोलिसांनी नोकरी सोडावी आणि तरुणांनी पोलिसांमध्ये भरती होऊ नये. तसेच पोलिसांनी त्यांच्या राजीनाम्याची एक प्रत इंटरनेटवर अपलोड करावी आणि सोशल मीडियावरही हा राजीनामा व्हायरल करावा, असं रियाझनं म्हटलं होतं.

हिजबुलच्या या धमकीचे पोस्टर जम्मू-काश्मीरच्या अनेक गावांमध्ये लागले होते. तसंच, हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले होते. इतकंच नव्हे, धमकीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती.

अतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे

पाकला अण्वस्त्रांची खुमखुमी, अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देण्याची धमकी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका