fbpx

वर्ल्ड कप २०१९ : आज टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा सामना विल्यमसनच्या न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

टीम इंडियाने नऊ पैकी सात सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं कारण आहे.

विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आणखी एक विक्रम रोहितला खुणावत आहे. इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू होण्याचा मान रोहितला मिळू शकतो. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे.

जाणून घ्या : या दोन संघाची वनडेची आकडेवारी

भारत विरुद्ध न्यूझीलंड

एकूण वनडे- १०६
भारत विजयी- ५५
न्यूझीलंड विजयी- ४५
टाय- १
अनिर्णित- ५

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषकात

एकूण वनडे- ७
भारत विजयी- ३
न्यूझीलंड विजयी- ४