बीसीसीआयमध्ये आजपासून ‘दादा’गिरी, गांगुली अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार

blank

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोधात निवड करण्यात आली. आज सौरव गांगुलीसह बीसीसीआयच्या निवडणुकीत सर्व सदस्य आपला पदभार स्विकारतील. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांचा समावेश आहे.

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा 39 वे अध्यक्ष असतील. ते पुढचे १० महिने या पदावर असणार आहे. गांगुली यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव असतील. उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष असतील.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. गांगुली यांच्या निवद्नीची घोषणा झाल्यानंतर ‘बीसीसीआयची प्रतिमा डागाळली असताना अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडं येते आहे. काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ही मोठी संधी आहे असं ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्थानिक क्रिकेटपटूंच्या आर्थिक हिताला आणि त्यासाठी रणजी ट्रॉफीवर लक्ष केंद्रीत करण्याचं काम करणार आहोत, असं गांगुलीने सांगितलं आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट संस्थेला चालवणं हे एक आव्हान असेल, पण मी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली होती.

महत्वाच्या बातम्या