fbpx

आज शर्मिला ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्या सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर त्या सांगली शहरातील पुरग्रस्तांशी भेटून समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर मिरज शहरालाही भेट देणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी ला भेट देऊन कराडकडे रवाना होणार आहेत.

 

दरम्यान, राज ठाकरे हेही पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं जाहीर केले होते. तसेच त्यांनी फोनवरुन पुरग्रस्तांची विचारपूस करून पिडितांना धीर दिला होता. तसेच लवकरात लवकर मी तुम्हाला भेटायला येतो असं आश्वासन दिले होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी तयार आहे. पूरग्रस्त बाधित गावांना जी मदत लागेल ती मदत आम्ही करू असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच राज्य सरकारने पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी ६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. यामध्ये ४ हजार ७०० कोटी सांगली आणि कोल्हापूरसाठी तर २ हजार १०५ कोटी कोकण, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी असणार आहे. त्याच बरोबर पडलेली घरं पुन्हा बांधून देण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिले.