उदयनराजेंच्या साताऱ्यात शरद पवारांची हवा, भव्य रॅली काढून केले शक्ती प्रदर्शन

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर पवार यांचा हा पहिलाच सातारा दौरा आहे. आगामी काळात उदयनराजे यांची राजकीय कोंडी करण्यासाठीची रणनीती आज ठरणार असल्याचं बोलले जात आहे. मात्र शरद पवार यांनी आज साताऱ्यात उदयनराजे नसतानाही चांगलेचं शक्ती प्रदर्शन केले आहे.

शरद पवारांनी आज साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेला भेट दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून शरद पवार यांनी रॅलीला सुरवात केली. या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी शानद पवार यांनी भाऊराव पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्ञानदानाचं पवित्र काम हाती घेतलं. त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली. शिक्षण सर्वांना मिळावा हा त्यांचा नेहमीच आग्रह होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं.

दरम्यान शरद पवार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी कोणती व्यूहरचना आखणार, तसेच कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.तसेच साताऱ्यात आता पोटनिवडणुक होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या पोट निवडणुकीचा रणसंग्राम पाहिला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचा सातार दौरा आज लक्षवेधी ठरणार आहे. इथून मागच्या दौऱ्यांमध्ये पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा चांगलाचं समाचार घेतला. त्यामुळे पवार आज उदयनराजेंच्या पक्षांतरावर काय भाष्य करणार हे पाहण ही औत्सुक्याच ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या