आज ‘या’ कारणामुळे पवार आणि फडणवीस एकाच मंचावर

pawar fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच सर्वच नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यावरून शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली होती. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

harad pawar and devendra fadanvis 1

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाधा’ या पुस्तकाच आज प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज हे दोन दिग्गज एकत्र येणार आहेत. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर केले आहे. तसेच अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवीन आणि युवा नेत्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.

विखेंविरोधात ‘या’ आक्रमक युवा नेत्याला कॉंग्रेस उतरवणार मैदानात ?

 

मी खासदारकीचा राजीनामा देणार नाही : नारायण राणे