रमेश कदमांचा पाय आणखी खोलात; कदम यांच्यावरील दोषारोपाला मंत्रिपरिषदेची मान्यता

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्याविरुद्ध आणखी चार घोटाळ्यांप्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.त्या मंजुरीमुळे रमेश कदमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमार्फत कोट्यवधी रुपये काढून अपहार करण्यात आला होता.

हिंगोली, सोलापूर, बीड जिल्ह्यांमधील हे घोटाळे आहेत. हिंगोलीतील घोेटाळ्यात महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, लिपिक सुजित पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. बीडमधील घोटाळ्यात महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक बापुराव नेटके, लक्ष्मण घोटमकुळे, सचिन कांबळे, श्रावण हातागळे यांच्याविरुद्धही दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

धनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे – सुरेश धस

ज्या अशोक जगदाळेंना नाकारले त्यांनाच उमेदवार म्हणून घोषित करण्याची राष्ट्रवादीवर नामुष्की