महाराष्ट्र इंच इंच विकला जातोय… यावर लक्ष्यभेदी ‘राज’सभा !!!

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात जाहीर सभा घेत आहेत. मनसेने फेरीवाल्यांचा मुद्दा आक्रमकतेने उचलल्या नंतर राज ठाकरे प्रथमच जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज नक्की काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्रच लक्ष लागल आहे.

पुण्यात फेरीवाल्याविरोधात आंदोलन केलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत, मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झालीये हे सगळे मुद्दे तापलेले असताना आज होणाऱ्या सभेला आधी परवानगी देखील नाकारली होती. त्यामुळे राज ठाकरेंची ठाकरी तोफ आज कोणाकोणावर धडाडणार हे पाहण्यासारख असणार आहे.

मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव हायकोर्टात गेलेत. एक कोटीचा जामीन कोणत्या आधारावर मागताय, असा सवाल त्यांनी थेट ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना केलाय.यावर राज काय बोलतात, ते पहावं लागेल.