कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधीचा अर्ज दाखल; राहुल यांची ‘ताजपोशी’ निश्चित

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांनी अर्ज दाखल केला . यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहनसिंह. सर्व वरिष्ठ नेते, कार्यसमितीचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान पक्षाध्यक्षपदासाठी दुसरा कोणाचा अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राहुल गांधी हेच अध्यक्ष होणार हे निश्चित मानल जात आहे.