मुंबई: कोरोना नंतर महागाई आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना सामान्यांना कसरत करावी लागत असताना इंधनांची दरवाढ देखील लागोपाठ सुरूच आहे आज पुन्हा इंधनांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
कच्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने ही वाढ झाल्याच सांगितलं जात आहे. मंगळवारी न्यूयॉर्क क्रूड एक्सचेंज मध्ये कच्या तेलाचे भाव वाढले सुरुवातीला सिंगापुरमध्ये डब्ल्यूटीआई क्रूड (WTI Crude) मध्ये सामान्य दरवाढ दिसली मात्र ब्रेंट क्रूड (Brent Crude) च्या किंमती वाढल्या आहेत. तर भारतीय बास्केट वर कच्या तेलाच्या किंमतीचा परिणाम महिन्यानंतर दिसून येतो तरी देखील इंधनदरवाढ सुरूच आहे.
यावेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल-डीझेल दोन्हींच्या किंमती 25 पैसे प्रति लीटर ने वाढल्या. त्यामुळे मुंबईत पेट्रोलने नव्वदीपारकेली आहे. तर गेल्या ५ दिवसांत इंधनात कोणतीही दरवाढ झाली नव्हती. तर दिल्लीत पेट्रोल 84.45 रुपये आणि डीझेल 74.63 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. गेल्या १० महिन्यांत पेट्रोलच्या किंमतीत 14 रुपये प्रति लीटर पेक्षजास्त वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आरपीआय आंदोलन करणार
- सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सरकारच बोलत आहे; राजू शेट्टींचा गंभीर आरोप!
- अनुसूचित जाती, जमाती अत्याचारासबंधी प्रलंबित प्रकरणे 15 फेब्रुवारीपर्यंत निकाली काढा – जिल्हाधिकारी
- ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स; राष्ट्रवादीवर संकटांची मालिका सुरूच
- कोरोनाच्या ६० हजार लसी औरंगाबादेत दाखल, चार जिल्ह्यांचा साठा उतरवला