शपथविधी राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन मोदींनी केले शहीदांना वंदन

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडणार आहे. भारतातील आणि विदेशातील मिळून ८ हजार लोकांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी शपथ घेणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन शहीदांना वंदन केले.

विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्यात ‘एडीए ’चे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी यांच्यासोबत ‘एडीए’चे ५०  ते ६०  जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार निवडक मंत्र्यांचा शपथविधी होईल व संसद अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात ४०  टक्के नव्या चेहर्‍यांना आणि २५  टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.