मोदी आज प्रयागराजमध्ये करणार कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण

टीम महाराष्ट्र देशा – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये पहिल्यांदाच जनसभेला आज संबोधित करणार आहेत. आज (रविवारी) दुपारी 12.30 वाजता पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर प्रयागराजमधील एका खासगी शाळेत लँड होणार आहे. प्रयागराजमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान संगमला भेट देतील. येथे ते अक्षय वट आणि हनुमान मंदिराला भेट देऊन तेथे पूजा अर्चना करतील. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते एका जनसभेला संबोधित करतील. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच जनसभा असणार आहे.

प्रयागराजमध्ये होणाऱ्या जनसभेमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभा 2019 निवडणुकीसंदर्भात मोठा संदेश देतील हे खरे. तसेच येथे पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे देखील लोकार्पण करणार आहेत. या लोकार्पणात 300 प्रकल्पांचा समावेश असून यामध्ये विमानतळ आणि 7 उड्डाणपुलांचा समावेश आहे.

You might also like
Comments
Loading...