#जम्मू काश्मीर : आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील ‘काळा दिवस’ : मेहबूबा मुफ्ती

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारनं राज्यसभेत आज मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी ३७० कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं आहे. त्यानुसार कलम ३७० मधील काही कलमं वगळण्यात येणार आहेत, असं अमित शाह यांनी संसदेत सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

याविषयी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून ‘आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे अस त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या निर्णयावरून हे कलम हटवणे हे अनैतिक आणि असंवैधानिक आहे असंही  त्यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी थयथयाट सुरु केला असून संसदेत गोधळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान,सैन्य ज्याप्रमाणे जम्मू काश्मिरात वाढविले होते त्यावरून सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारी असल्याचे बोलले जात होते.

काश्मीरला आज वाजपेयींची उणीव जाणवते : मेहबुबा मुफ्ती