आज माझ्या जीवनातील सर्वात वाईट दिवस : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचा साधा फोटोसुद्धा नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता. असे अशा भावना राश्र्वाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.

आज (ता. १७) बीडमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ” या विधानसभेची निवडणूक ही इमानदारी विरुद्ध बेईमानीची आहे. सर्व कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेब यांच्या संगनमताने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी पक्षांतर केले. याला म्हणतात बेईमानी, या बेईमानीला केजच्या मातीत गाडा.” तर भाजपा सरकारला दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बीड जिल्ह्यात प्रचारसभा घेतली. यात ”कलम 370 हटविल्याने न्याय मिळाला आहे. हा निर्णय घेण्यात आला तेव्हा विरोधकांकडून याला प्रचंड विरोध झाला. भाजप पक्ष जन्मापासून कलम 370 ला विरोध करत आहे. हा राजकीय निर्णय नसून देशहिताचा निर्णय आहे,” असे म्हणत मोदींनी परळीत येत्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, भाजपा अन् मोदींना गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :