अटल बिहारी वाजपेयींचा आज स्मृती दिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

टीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा  आज प्रथम स्मृतिदिन आहे. या निमित्ताने अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांनी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. तसेच वाजपेयींचे नातेवाईकही यावेळी उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्ट २०१८ ला दीर्घ आजाराने निधन झालं होतं. त्यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांचा आज प्रथम स्मृतिदिन साजरा होत आहे. प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी त्यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिका यांच्यासह मित्र परिवारातील दिग्गजांनी हजेरी लावली.

दरम्यान, वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव करत भाजप सरकारने २०१४ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले होते. वाजपेयी यांची राजकीय कारकीर्द पाहता ते देशाचे ३ वेळा पंतप्रधान बनले परंतु त्यांना केवळ एकदाच संपूर्ण कार्यकाळ एकदाच पूर्ण करण्यात आला.