भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सुरु होणाऱ्या या सामन्याचं धावतं वर्णन आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीमधून प्रसारित केलं जाणार आहे.

मागच्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळी करत विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी होती. तर त्याला श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली होती. तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने ४ गडी बाद करत विजयात मोठा वाटा उचलला होता. तर या सामन्यात वेस्ट इंडिजला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

Loading...

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता तर दुसरा सामना भारतीय संघानं ५९ धावांनी जिंकला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून वेस्ट इंडीज मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या सामन्यानंतर दोन्ही संघांमधे दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

दरम्यान, आजचा सामना हा युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलचा शेवटचा सामना ठरू शकतो. करण या मालिकेनंतर तो रिटायर्ड होण्याची शक्यता आहे. या मालिकेत त्याने फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. खरंतर तो वर्ल्डकप नंतर रिटायर्ड होणार होता परंतु त्याने भारताविरुद्ध मालिका खेळण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'