आज अण्णांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला काल रामलीला मैदानावर सुरुवात झाली. २०११ साली झालेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा शेतकरी संघटनांचीही म्हणावी तेवढी उपस्थिती दिसत नाही तर यावेळी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला दिल्लीकडून देखील फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.

पण दरम्यान, यावेळी मोदी सरकार आपल्या कार्यकर्त्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी काल केला. तर अण्णांना चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे आंदोलनाच्या या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो का यावरच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.