आजचा दिवस हा सोन्याचा अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस

टीम महाराष्ट्र देशा : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येणार असल्याचा सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तसेच मुस्लिमांना आयोधेयेत ५ एकर पर्यायी जागा देण्यात येणार असल्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. या वेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ” आजचा दिवस हा सोन्याचा अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षपासून जो वाद प्रलंबित होता.तो वाद आज संपला आहे. आतापर्यंत श्री रामने रामराज्य उभे केले, रामाच्या कथा पण ऐकत होतो. मात्र रामाचा जन्म कुठे झाला याबाबत खूप वादविवाद होते. आज या सर्व वाद संपला. सर्वोच्य न्यायालयाने जो निर्णय दिला तो समस्त हिनुस्साठीच नाही तर देशातील सर्व जनतेच्या भविष्यासाठी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने देशातीलच नव्हे तर जगातील सर्व हिंदुना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेयांची आठवण झाली असेल.”

ते पुढे म्हणाले की, हा निर्णय देशातील सर्व धर्मियानि हा निर्णय आनदाने मान्य केल्यामुळे मी सर्व देशवासीयांना धन्यवाद देतो, आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. आज मी राजकारणावर बोलणार नाही. राम मंदिरासाठी लालकृष आडवाणी यांचे मोठे योगदान आहे. आयोध्येत एक अनामिक शक्ती आहे. जी तुम्हाला नतमस्तक व्हायला लावते. तर राम मंदिर लढ्यात ज्या कारसेवकांनी मोठे योगदान दिले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच जे शहीद झाले त्यांचे स्मरण करतो. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

त्यानंतर ते म्हणाले येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा शिवनेरीवर जाणार आहे. वेळ मिळाला तर येत्या २४ तारखेला अयोध्येतही जाईल. एका नव्या पर्वाला सुरवात झाली आहे. या नव्या पर्वाचे स्वागत करायचे आहे. तसेच या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शांताता आणि सलोख राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...

 

Loading...

Loading...