गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या

naxal

गडचिरोली – भामरागड तालुक्यातील ताळगाव पोलिस स्थानक हद्दीतील कसनुर येथील मालू दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी व लालसु मासा कुळयेटी या तिघांची पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केली. तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा बदला घेण्यासाठी हे खून करण्यात आल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.

मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू कुडयेटी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. कसनासुर गावातच २२ एप्रिल २०१८ रोजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले मिळाले होते.त्यावेळी पोलिसांना गुप्त माहिती पुरविल्याचे संशयावरून सदर तिन्ही इसमांची हत्या करण्यात आल्याची घटनास्थळी लावण्यात आलेल्या फलकावर उल्लेख करण्यात आला आहे.