आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, बघुयात काय होतय ते ! – मोदी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदानापूर्वी पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे, दोन दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये झालेल्या राड्यानंतर भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज सायंकाळपासून प्रचारावर बंदी घातली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे.

मोदी यांनी मध्य प्रदेशात आयोजित सभेत बोलताना आज पुन्हा एकदा बंगालमध्ये जाणार आहे. पाहुया, आता काय होते, असे म्हणत ममतांना आव्हान दिले आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या सभेत देखील तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता, आता अमित शहा यांच्या रोड शोमध्ये गोंधळ घालण्यात आला आहे. तरीही मी पुन्हा एकदा आज बंगालमध्ये जाणार आहे. असे म्हंटले आहे.

पश्चिम बंगालमधील दिवसेंदिवस वाढता हिसांचार पाहता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज भाजप आणि तृणमूल नेते सभांमधून एकमेकांवर कडाडून टीका करणार असल्याचं दिसत आहे.Loading…
Loading...