राज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाचा फटका, मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. काही भागात पावसाची संतधार सुरु आहे. तर राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे.

तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाला देखील चांगलाच फटका बसला आहे. हाती आलेल्या पिकाचे पावसाच्या फटक्याने नुकसान होत आहे. मुंबईत दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्री मुंबईत जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढल आहे. दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळला.

लातूर रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा धरणाची पाणीपातळी वाढली. शिवाय गेली दोन ते तीन वर्ष कोरडी असलेली मांजरा नदी लगेचच प्रवाहित झाली.

उस्मानाबाद मागील तीन ते चार दिवसात पडत असलेल्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मतांच्या टक्केवारी परिणाम झालाच. त्याचबरोबर काढणीला आलेली सोयाबीन पावसामुळे काळी पडू लागलीये, यामुळे पिकांना अपेक्षित हमी मिळणार नाही.

दरम्यान पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या