fbpx

छगन भुजबळांनंतर समीर भुजबळ यांना जामीन भेटणार का ? कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आता त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच समीर यांनीही ईडीच्या कायद्यातील कलम ४५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं आहे. त्यामुळे कोर्ट छगन भुजबळ यांच्याप्रमाणे समीर यांना जामीन देतं का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काय आहे समीर भुजबळ यांचे मनी लॉड्रिंग प्रकरण

फेब्रुवारी २०१६ मध्ये मनी लॉड्रिंग प्रकरणात समीर भुजबळला ईडीकडून अटक करण्यात आली. खोट्या कंपन्या स्थापन करून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील लाचखोरीचे पैसे फिरवल्याचा ठपका समीर भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सदन बांधकामात ७८५ कोटींचा घोटाळा झाल्याचा ‘ईडी’ने दावा केला आहे. दरम्यान, यापूर्वी हायकोर्ट आणि ईडी कोर्टाने अनेकदा समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये पीएमएलए कायद्यातील कलम ४५ सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन समीर भुजबळची जामिनासाठी पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे.

1 Comment

Click here to post a comment