परवा कॉंग्रेसला राम-राम ठोकला, चौघांचा आज होणार शपथविधी

टीम महाराष्ट्र देशा- कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने विलीनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली आहे. दिल्लीला गेलेले सगळे नेते शुक्रवारी सकाळी राज्यात परतणार आहेत.

काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केलेले चंद्रकांत (बाबू) कवळेकर, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज तसेच उपसभापती मायकल लोबो अशा चौघांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आणि अपक्ष रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. नव्या मंत्र्यांचा शुक्रवारी रात्री अथवा शनिवारी सकाळी शपथविधी होणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.