चोराच्या उलट्या बोंबा ; मुंबईवरील दहशतवादी हल्ला भारतानेच घडवून आणला : पाकिस्तान

टीम महाराष्ट्र देशा- चोराच्या उलट्या बोंबा कशाला म्हणतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला आला आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याबद्दल माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या विधानानं अडचणीत सापडलेल्या पाकिस्ताननं आता नवा आरोप केला आहे. भारतानंच मुंबईवरील हल्ला घडवून आणला, असा अजब दावा पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यामागे भारताची गुप्तहेर यंत्रणा रॉचा हात आहे, असे अकलेचे तारेदेखील मलिक यांनी तोडले आहेत.

दरम्यान,पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पहिल्यांदाच मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात असल्याची कबुल दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जागासमोर आलाय.ते एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.

यावेळी नवाज शरीफ यांनी दहशतवादी संघटनांवरही भाष्य केलं. काही ‘दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. त्यांना सीमा ओलांडायची आणि मुंबईत जाऊन 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी द्यायला हवी का?,’ असं शरीफ यांनी म्हटलं आहे.’रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात आम्ही मुंबई हल्ल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही ?,’ असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.पुढे ते म्हणाले की, ‘एका देशात एकच सरकार चालू शकतं. पाकिस्तानात मात्र अनेक समांतर सरकारं आहेत. त्यामुळे देश चालवायचा तरी कसा’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले मलिक
26/11 चा हल्ला रॉने घडवून आणला. या हल्ल्याला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा होता. काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनांकडे जगाचं दुर्लक्ष व्हावं, यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला.’पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं. त्यांच्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जात आहे.भारतीय माध्यमांनी विधानाची तोडमोड करुन अर्थाचा अनर्थ केला आहे.

You might also like
Comments
Loading...